शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सुधीर दरेकर सर एल एल बी परीक्षेत प्रथम श्रेणीतुन उत्तीर्ण

संगमनेर | बाळासाहेब भोर : तालुक्यातील कऱ्हेश्वर माध्यमीक विद्यालयाचे शिक्षक सुधीर रामनाथ दरेकर हे नुकतेच एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. समाजसेवक, निसर्गसेवक, आदर्श शिक्षक ते कायद्याचे अभ्यासक असा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

पेशाने शिक्षक असल्याने आजपर्यंत त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, महापुरुषांचे फोटो भेट देणे, विविध पुस्तके भेट देणे, शाळांसाठी शालेय साहित्य वाटप, वृत्तपत्रातील महत्वाची कात्रणे जमा करणे, विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देणे व तेथील माहिती समजून घेणे असे विविध उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. साधी राहणी व उच्च विचार हे तत्व त्यांना तंतोतंत लागू पडते. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना आजपर्यंत अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आजपर्यंत त्यांनी अनेक सामाजिक संस्थांत काम करताना विविध पदे भूषविली आहेत. सामान्यातील असामान्य व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. संगमनेरमधील ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेजमधून ते प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाल्याने तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button