कामराच्या विधानावर शिवसैनिक संतप्त – राहुरीत जोडे मारो आंदोलन, गुन्हा दाखल करण्याची मागणी

राहुरी प्रतिनिधी – सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या विरोधात राहुरी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कामराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली.
शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांनी सांगितले की, “कुणाल कामरा यांनी आपल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानकारक विधाने केली. या विधानांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, शिवसैनिक हे सहन करणार नाहीत. कामरा यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक त्यांना धडा शिकवतील.”
या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी शेतकरी सेना जिल्हा प्र.राजेंद्र लोंढे, सुभाष जुंदरे, उपजिल्हा प्र. जयवंत पवार, विजय तोडमल, दादासो शिंदे, युवा सेनेचे सचिन करपे, अशोक तनपुरे, निखील भोसले, अनिल आढाव, दिपक जाधव, राजू जाधव, प्रशांत खळेकर, अरुण जाधव, महेंद्र शेळके, सुभाष शिंदे, गणेश निमसे, रोहित नालकर, उमेश कवाणे, महेश घोरपडे, संदीप करपे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर धसाळ, बापूसाहेब काळे, बाळासाहेब जाधव, गोविंद जाधव, ॲड. विजय तोडमड यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसैनिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश असून, कामरा यांनी लवकरात लवकर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.