अहिल्यानगर

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणी मनसे आक्रमक

राहुरी : शहरातील बुवासिंधबाबा तालिम परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची एका अज्ञात इसमाकडून विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मनसे राहुरी तालुक्याच्या वतीने याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, दोन दिवसांच्या आत आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने स्वतः आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते यांनी दिला आहे.

यावेळी मनसेचे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, उप जिल्हाध्यक्ष भाऊ उंडे, तालुकाध्यक्ष मनोज जाधव, तालुका उपाध्यक्ष राहुल पिले, तालुका सचिव अनिल गीते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनवीसे संघटक सागर माने, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय पेरणे, मनवीसे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, मनवीसे शहराध्यक्ष संदेश गायकवाड, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राजू आढगळे, राहुरी फॅक्टरी मनवीसे शहराध्यक्ष प्रमोद विधाते, सागर नालकर, शरद वाघ आदी मनसैनिक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button