धार्मिक

हरिगाव येथे इस्टर सण भक्तिभावाने साजरा

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) – प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करण्यासाठी हरिगाव येथे इस्टर सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. गेले चाळीस दिवस उपवास, प्रार्थना आणि दानधर्मातून आत्मशुद्धी साधल्यानंतर आजचा दिवस ख्रिस्ती समाजासाठी आनंदाचा आणि नवजीवनाचा संदेश घेऊन आला.

या प्रसंगी हरिगाव मतमाउली भक्तिस्थानाचे प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारीओ यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रभू येशू खरोखरच मरणावर विजय मिळवून उठला आहे. जर प्रभू येशू उठला नसता, तर आमचा विश्वास व्यर्थ ठरला असता. येशूच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन, प्रेम आणि तारण मिळाले आहे.”

ईस्टरचा हा पवित्र दिवस संपूर्ण ख्रिस्ती समाजात विशेष भक्तीभावाने साजरा करण्यात आला. घरोघरी पवित्र पाण्याची शिंपण करून आशीर्वाद घेतले गेले. यावेळी प्राचीन वलान्डन सणाची आठवण करत प्रभूच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.

या आनंददायी सोहळ्यात धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारीओ, फा. फ्रान्सिस ओहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक आणि सामाजिक कार्यात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये फा. वसंत सोज्वळ, इग्नेशियस साळवे, वाय. जी. त्रिभुवन, राजू पठारे, सुभाष पंडित, राजेंद्र मगर, मयूर कदम, बी. जी. पारधे, डी. एस. गायकवाड, ज्यो दिवे, श्रीमती ओहोळ, छायाचित्रकार बी. आर. चेडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे निवेदन विलास साळवे, आंद्रेस राठोड, राजू राठोड आणि सुभाष बोधक यांनी केले. यावेळी हरिगाव व भोकर येथील सिस्टर्स, परिश कौन्सिल सदस्य व असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना इस्टरच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button