छत्रपती संभाजीनगर
धनगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील धनगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषिरत्न वसंतराव कातबने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राज्यशासनाचा कृषिरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक वृंदानी त्यांचा सत्कार केला. या वेळी विद्यार्थींनी भाषणे केली. तसेच कातबने यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच बापूसाहेब कातबने, योगेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर महाले, संजय इमले, मुख्याध्यापक शिंदे, शिक्षक औटे, कोकाटे, सपाटे, पिंगळे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.