छत्रपती संभाजीनगर

श्री ची एक आरती आपले रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या हस्ते करा -गोविंद बावणे

विलास लाटे | पैठण : कोरोना काळात दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही निर्बंध मुक्त गणेशोत्सवाची घोषणा केलेली आहे. या सार्वजनिक आनंदोत्सवाच्या निमित्ताने तमाम गणपती उत्सव मंडळांना गोविंद बावणे यांनी एक आव्हान वा विनंती केली आहे की यावर्षी गणेश उत्सवामध्ये आपल्या मंडळाची एक आरती ही आपल्या रक्षणकर्त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हस्ते करावी.
प्रत्येक मंडळ उत्सवाची आरती अकरा दिवस दोन वेळा म्हणजे बावीस वेळा होते. त्यातील एक आरतीचा मान हा आपल्यासाठी रात्र-दिवस पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावा. हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांना घरातील आरतीला हजर राहता येत नाही. आपल्याला मोठ्या उत्साहाने सण-उत्सव साजरे करता यावेत म्हणून पोलीस त्यांच्या घरच्या सण-उत्सवाला हजर न राहता आपली म्हणजेच समाजाची सेवा करत असतात.
आपल्यासाठी झटणाऱ्या या पोलिसांसाठी आपणही काहीतरी करणं हे आपलं माणूस म्हणून एक कर्तव्य आहे. निदान आपल्या सर्व गणेश मंडळांनी त्यांना एका आरतीचा मान देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला या उत्सवात सहभागी करून घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होईल असे प्रतिपादन गोविंद बावणे यांनी केले.

Related Articles

Back to top button