सामाजिक

राहुरी फॅक्टरी येथे ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान, उपक्रमाचे प्रांताधिकारी जगताप यांच्याकडुन कौतुक

राहुरी प्रतिनिधी : राहुरी फॅक्टरी येथे स्वातंत्र्य दिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करत शिबिर यशस्वी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ व वैष्णवी चौक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी जगताप यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले.

    कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची नितांत गरज भासत आहे. यामुळे सामाजिक संघटनांनी आसरा फाउंडेशन, बारामती यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ.दयानंद जगताप, तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, मुख्याधिकारी अजित निकत, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राहुुुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे आदी उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा २ लाखाचा अपघाती विमा काढण्यात आला. सर्व मान्यवरांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी रक्तदात्यांचे आभार मानून स्वातंत्र्य दिनी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

   ‌‌यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, आदिनाथ कराळे, भारत शेटे, सागर खांदे ,भीमराज मुसमाडे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, वैष्णवी चौक प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष कराळे, पत्रकार शरद पाचारने, सुनील भोंगळ, संदीप पाळंदे, विजय भोसले, आकाश येवले, मनोज गावडे, ऋषी राऊत आदी उपस्थित होते. या शिबिरास राजे छत्रपती प्रतिष्ठानचे प्रदीप गरड ,शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन,जयेश मुसमाडे,राजेंद्र लांडगे, डॉ.अनंतकुमार शेकोकर, शिवचरित्रकार हसन सय्यद, मनीषा पोटे यांनी भेट दिली. वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कराळे,उपाध्यक्ष मयूर मोरे, सुयोग सिनारे, अमोल कदम, मनोज कदम, मच्छिंद्र दोंड, बाळासाहेब वाळुंज, प्रसाद कदम, बाबासाहेब खांदे, अमोल वाळुंज, सचिन कदम, संदीप कदम, महेंद्र दोंड, चारुदत्त दोंड, धनंजय विटनोर, नितीन मोरे, जालिंदर दोंड, संतोष कदम, योगेश मोरे, सुनील जाधव, सुजित लोंढे, सुजित सिनारे, मनोज तांबे,हेमंत कदम, सचिन जाधव, आदिनाथ कुटे, अविनाश वरखडे, तुषार गोपाळे, वैभव कदम, अक्षय पेरणे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button