छत्रपती संभाजीनगर
आंतरवाली खांडी येथे शिव जयंती उत्साहात साजरी
पाचोड|विजय चिडे : आंतरवाली खांडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी मारूती मंदिरासमोर शिवाजी महाराज चौक या ठिकाणी देखील शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांना मान वंदना देण्यात आली. अशोक विद्यालय येथे देखील शिव जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व शिक्षक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.