सामाजिक
ना. डॉ. राऊत मित्रमंडळाचे वतीने राजेश लांडेंच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटप
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे उर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेशजी लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फराळाचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करून जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे संजय भोसले म्हणाले.
प्रसंगी फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक संजय भोसले, काँग्रेस कोल्हार खुर्दचे अध्यक्ष सुरेश पाटील शिरसाठ, राहुरी तालुका काँग्रेस कमिटी अ. जा. वि. अध्यक्ष बाबासाहेब सगळगिळे, अल्पसंख्यांक विभाग काँग्रेसचे जिल्हा सचिव दिपक कदम, फोरमचे जिल्हा सचिव प्रकाश भिगारदिवे, किरण घोलप, अल्फोन्स भोसले, सुधीर भोसले, सचिन शिंदे, मंगेश शिंदे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.