आरोग्य

जेष्ठ नागरीक संघ आयोजित ८४ वे मोफत नेत्र रोगनिदान शिबिर संपन्न

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना व के के आय बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व कै.यादवराव दादा पवार व कै.सौ.इंद्रायणी यादवराव पवार यांचे स्मरणार्थ बंडू यादवराव पवार, सौ. आशाबाई दत्तात्रय गडाख व सौ. केशरबाई अशोकराव राजदेव यांचे सौजन्याने ८४ वे मोफत नेत्र रोग निदान शिबिर राहुरी नगरपालीकेच्या गोकुळ कॉलनी येथिल योगा हॉलमध्ये संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन सौ.केशरबाई राजदेव यांचे हस्ते झाले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी राहुरी आश्रमशाळेचे माजी मुख्याध्यापक जगन्नाथ वि.सूर्यवंशी होते.
या शिबिरात मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. जेष्ठ नागरीक संघाने आतापर्यत आयोजित शिबीरामध्ये रुग्णांची तपासणी होऊन बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे ५२२५ मोतीबिंदु शस्त्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत, सूर्यवंशी अध्यक्षपदावरुन बोलतांना म्हणाले की, श्री.संत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु केलेला जेष्ठ नागरीक संघ राहुरी तालुक्यातील गरजु रुग्णांना दृष्टी देण्याचे महान कार्य करत असुन त्यांच्या कार्याला व तपासणीसाठी उपस्थित रुग्णांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदाशिव पवार यांनी तर प्रास्ताविक शिवाजी कोहकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सूर्यभान कदम यांनी मानले. यावेळी सौ.देशमुख, डॉ.सौ.कोरडे, व सोलट सर यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. राधाजी गायकवाड यांनी संघाच्या कार्यावर आधारीत स्वरचित कविता सुंदर आवाजात सादर केली,  कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी रा.न.प.चे मा.नगराध्यक्ष अशोकराव आहेर, बळीराम खैरनार, वसंतराव झावरे व संघाच्या जेष्ठ सहकारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button