श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : 200 पेक्षा जास्त आयुर्वेदिक हर्बल कॉस्मेटिक सेंद्रिय उत्पादने असणारे प्रशस्त व मन प्रसन्न करणारे दालनाचे उद्घाटन अहमदनगर महानगरपालिका आरोग्य समिती अध्यक्ष, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्रिमूर्ती आयुर्वेदचे डॉ. महेश क्षीरसागर, श्रीजी आयुर्वेद चे डॉ.सतीश भट्टड, द्वारका आयुर्वेदचे डॉ. स्वप्निल नवले, डॉ. महेंद्र बोर्डे, डॉ. महेश वाळके, डॉ. मतीन शेख, डॉ.तेजस सूर्यवंशी, डॉ. प्रमोद गागरे, डॉ. प्रीतम गोरडे, डॉ. सोनाली खर्डे, डॉ.शामल उंडे, डॉ.लखोटिया व सर्व क्षेत्रातील सामाजिक, राजकीय व मित्रपरिवार उपस्थित होता. त्यावेळी श्री आयुर्वेदचे संचालिका सौ.सोनल संदीप त्र्यंबके व संदीप पांडुरंग त्र्यंबके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
दि. 21 नोव्हेंबर रोजी श्री आयुर्वेद, श्रीरामपूर येथे हाडांची मोफत तपासणी अत्याधुनिक बिएमडी या मशीन द्वारे करण्यात येणार असल्याची माहिती संदीप त्र्यंबके यांनी दिली. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.