अहिल्यानगर
पुरस्काराने काम करावयास उर्जा मिळते : तहसीलदार प्रशांत पाटील
श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : पुरस्काराने काम करावयास उर्जा मिळते असे प्रतिपादन श्रीरामपूर येथील तहसीलदार प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
महसुल दिना निमित्त जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. गेल्या दिड वर्षा पासुन कोरोना सारख्या महामारीच्या आजाराला रोखण्यासाठी तालुक्यामध्ये उत्कृष्ट नियोजन करुन कोरोना रोखण्यात मदत केली. तसेच लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात आले. स्वः रावसाहेब शिन्दे प्रतिष्ठाणचे चेअरमन माजी प्राचार्य टि.ई. शेळके, वाचन संस्कृती प्रतिष्ठाणचे डॉ.बाबुराव उपाध्ये व भुमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था सदस्य आरोग्यमित्र भिमराज बागुल यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.