धार्मिक

6 जुलै पासून हरेगाव मतमाऊली यात्रापूर्व नऊ शनिवार नोव्हेना प्रारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान हरेगाव येथे सालाबाद प्रमाणे मतमाऊली यात्रा साजरी करण्यात येणार असून सहा जुलै पासून पवित्र मरियाच्या सन्मानार्थ नऊ शनिवार नोव्हेनास प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रमुख धर्मगुरू रे. फा डॉमिनिक रोझारिओ यांनी दिली.

त्याप्रमाणे 6 जुलै पहिल्या दिवशी पवित्र मरिया सहभागीता या विषयावर संत फ्रान्सिस चर्च राहता, होली फॅमिली चर्च कोपरगाव, रोझरी चर्च कोळपेवाडी येथील धर्मगुरू प्रवचन करतील, दि. 13- पवित्र मरिया ख्रिस्ती ऐक्य – निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बाळ येशू चर्च बाभळेश्वर, दि. 20- पवित्र मारिया आणि कुटुंब – ज्ञान माऊली चर्च नेवासा, नित्य सहाय्य माता चर्च अशोक नगर, दि. 27- आरोग्यदायींनी पवित्र मारिया – लोयोला सदन चर्च श्रीरामपूर, संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळक नगर, दि. 3 ऑगस्ट – पवित्र मरिया युवकांचा आदर्श – स्नेह सदन चर्च राहुरी संत जोसेफ चर्च केंदळ, फातिमा माता चर्च राहुरी फॅक्टरी, 10 ऑगस्ट – पवित्र मारिया कराराचा कोष- डॉन बॉस्को चर्च सावेडी संत जॉन चर्च भिंगार संत अण्णा चर्च अहमदनगर, दि. 17 ऑगस्ट – पवित्र मरीया शोसिकतेचा उच्चांक – सेक्रेड हार्ट चर्च सोनगाव, संत जोसेफ चर्च पानोडी, दि. 24 ऑगस्ट – पवित्र मरिया पावित्र्याचा आदर्श – संत मेरी चर्च संगमनेर संत इंग्नाथी चर्च घुलेवाडी, संत झेवीयर चर्च मनमाड, दि. 31 ऑगस्ट नवव्या शनिवारी पवित्र मरिया ईश्वर कृपेची माता या विषयावर ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव, होली स्पिरिट चर्च शेवगाव, भक्ती निवास चर्च पाथर्डी येथील धर्मगुरू प्रवचन करतील.

पवित्र मरिया मातेच्या सन्मानार्थ मतमाऊली यात्रा निमित्ताने 9 शनिवार मतमाऊली नोव्हेना भक्ती सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरेगांव चर्च प्रमुख धर्मगुरू फा.डॉमीनिक रोझारिओ, फा. फ्रान्सीस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज व सर्व धर्मभगिनी, चर्च संलग्न सर्व संघटना सदस्य, हरेगांव, उंदीरगाव ग्रामस्थ आदिंनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button