भारतीय वन सेवा परीक्षेत शिरीन पंडित महाराष्ट्रात चौथी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उंदीरगाव येथील स्वर्गीय गुलाब पंडित यांची नात व संजय गुलाब पंडित पिंपरी पुणे यांची कन्या शिरीन पंडित हिने यूपीएससी वनसेवा (IFS) परीक्षेत महाराष्ट्रात चौथी रँक पटकावली. एकूण 147 यशस्वी उमेदवारांपैकी सुमारे 20 जण हे महाराष्ट्रातील आहेत. माझा याआधी मी नागरी सेवेचा चौथा आणि फॉरेस्ट परीक्षेचा दुसरा प्रयत्न होता.
यावेळी बोलताना शिरीन पंडित म्हणाल्या की, मी 2020 पासून घरूनच परीक्षेची तयारी केली. तेलंगणातील पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्या ग्रुपच्या मुलाखतीचाही फायदा झाला. मी क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या प्रश्नावर काम करणार आहे. एकूण भूभागापैकी नागरिकांच्या मदतीने 30% फॉरेस्ट कव्हर वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांचे शिक्षण एमएससी ॲग्री झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरू डॉमनिक, माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक वीरेश गलांडे, सुभाष पंडित आदींसह त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.