अहिल्यानगर

प्रत्येक गावात दिव्यांग जनजागृती अभियान – सरपंच आशा चक्रनारायण

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : प्रत्येक गांवात दिव्यांग जनजागृती अभियान राबवित असल्या कारणाने दिव्यांग ज्ञानाने, प्रेरणेने नक्कीच सदृढ व सक्षम बनल्याशिवाय राहणार नाही.
संजय साळवे व वर्षा गायकवाड यांनी हाती घेतलेली हि जनजागृती मोहिम दिव्यांगाच्या जीवनात खात्रीशीर आमूलाग्र बदल घडवून आणेल. खोकर ग्रामपंचायतीचा 5% निधी तातडीने दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. रमाई, शबरी व पंतप्रधान आवास घरकूल योजनेमध्ये दिव्यांगाना प्राधान्यक्रमाने समावेश केला जाईल. संजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली खोकर ग्रामपंचायत मार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतील असे प्रतिपादन खोकर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.आशा चक्रनारायण यांनी दिव्यांग जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजीत दिव्यांग जनजागृती अभियान खोकर येथे सोसायटी सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव होते. कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष मूश्ताक तांबोळी, महिला राज्याध्यक्षा स्नेहा कूलकर्णी, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, सरचिटणीस अब्दूल पठाण, भोकर शाखेचे अध्यक्ष मनोज शिंदे, सचिव राजेंद्र राहिंज, टाकळीभान शाखेचे अध्यक्ष अजित दूधाळे, ग्रामपंचायत सदस्य राजू चक्रनारायण, बाबासाहेब पटारे सर यांची प्रमूख उपस्थिती होती.

याप्रसंगी मूश्ताकभाई तांबोळी यांनी संघटना व संघर्ष याचे महत्व विषद केले. संघटनेची माहिती स्नेहा कूलकर्णी यांनी दिली. दिव्यांग मतदार व सूलभ मतदान प्रक्रिया यांविषयी वर्षा गायकवाड यांनी सविस्तर विवेचन केले. दिव्यांग कायदा 1995 व 2016, समाज कल्याणच्या विविध योजना, जि.प., पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत 5% निधी, संजय गांधी निराधार योजना, विविध शासकिय योजना यांविषयी सविस्तर मार्गदर्शन संजय साळवे यांनी उपस्थित दिव्यांगाना केले.

कार्यक्रम प्रसंगी आसान दिव्यांग संघटनेची खोकरची कार्यकारणी निवडण्यात आली. मार्गदर्शक कादिर शेख, सल्लागार राजू चक्रनारायण, अध्यक्ष विकास साळवे, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, सचिव ज्ञानेश्वर भोंडगे, खजिनदार संदिप चक्रनाराण यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन राजू चक्रनारायण यांनी केले. प्रास्तविक बाबासाहेब पटारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू चक्रनारायण, कादिर शेख, माजीद शेख, नामदेव सलालकर, रेवनाथ भणगे, सूरेश काळे, उत्तमराव पूंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार विकास साळवे यांनी मानले.

Related Articles

Back to top button