हरेगाव यात्रापूर्व दुसरे नोव्हेना पुष्प संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे यात्रापूर्व दुसरे पुष्प फा.नेल्सन परेरा यांनी गुंफताना प्रतिपादन केले की, आज आपण मतमाउलीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्याचा मला आनंद होतो. आध्यात्मिक तयारीचे दुसरे पुष्प आजच्या उपासनेचा विषय आहे “पवित्र मारिया नवीन कराराचा कोश”.
आजच्या विषयावर मनन चिंतन करताना ती कशा प्रकारे कोश होती ते समजेल. येशू ख्रिस्त हा नवीन मोशे होता. तो निर्गमन होता. त्याने सर्व इस्त्राइल लोकांची सुटका केली. अस्त्यातून त्याने सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल केली. तो स्वर्ग राजाचा संदेश देत आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र झाला. ज्यू लोकांचा तो केंद्रबिंदू होता. तेथे कोश निर्माण केला. त्यात तीन गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या म्हणजे मानणा, पौहुर्णाची काठी, देवाच्या दहा आज्ञा, अशा त्या कोशाची निर्मिती झाली.
पवित्र मारियेव्दारे नवीन कोश आला. पवित्र मरीयेच्या उदरी नवीन मानणा निर्माण झाला. तो म्हणजे येशू ख्रिस्त. तो प्रमुख याजक झाला. त्याच्या द्वारे नियम व जीवन दिले आहे. अशा प्रकारे ती नवीन कराराची कोश आहे. या नोव्हेनात प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, संजय पंडित आदी सहभागी होते.