भिडेंवर कठोर कारवाई करावी- सचिन गुलदगड
श्री संत सावता माळी युवक संघाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
नगर – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी (भिडे) यांनी जय भारत मंगल कार्यालय अमरावती येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या बाबत अशोभनीय वक्तव्य केलेले आहे. थोर समाज सुधारकांविषयी वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडविणा-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी ई-मेल द्वारे पाठविले आहे.
भिडे यांनी महात्मा फुले यांचे विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे फुले अनुयायीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अशा वक्तव्यामुळे देशात जातीय तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने भिडेचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे वतीने केलेली आहे.
तरी भिडे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केली आहे.