माळवाडगाव येथे अवैध दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; एकाच हॉटेलवर तीन दिवसात दुसरी कारवाई
श्रीरामपूर : जिल्ह्यातील गुन्हेगारीचा अभ्यास असलेल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हेगारांच्या मुळावर घाव करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात अवैध दारू विक्रीमुळे वाढलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस कारवाईचे आदेश दिल्याने २१ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवाडगाव शिवारातील खानापूर रोड लगत असलेल्या ‘हॉटेल साहेबा’वर कारवाई केली.
ज्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४२०/- रु. किमंतीच्या ६ बाटल्या देशी दारु, १६६५/- रु. किमंतीच्या ९ बाटल्या बिअर, ११२०/- रु. किमंतीच्या ८ कँन बिअर, असा एकूण ३२०५ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल व १ आरोपी मिळून आला. याप्रकरणी रंजीत पोपट जाधव नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी हुसेन कादर शेख याच्या विरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३६८/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे हे करत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे रोहित मिसाळ, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाट यांनी केली आहे.