क्रीडा

नॅशनल क्रिकेट स्पर्धेत परी 11 संघाने मारली बाजी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिपक साठे यांच्या वतीने एल एस व्हीजन व नॅशनल क्रिकेट क्लब हरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान दिपकदादा साठे चषक या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत दिपक साठे यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. त्यात प्रथम पारितोषिक 71 हजार रुपये परी 11 संघमालक योगेश निर्मळ, दिपक खैरनार यांना देण्यात आले. द्वितीय पारितोषिक 51 हजार रुपये एस. व्हिजन संघ संघमालक दिपक साठे, तृतीय पारितोषिक 31 हजार रुपये जेके 11 संघमालक हुसेनभाई खाटीक, चतुर्थ पारितोषिक 21 हजार रुपये स्पोर्ट्स संघमालक अमोल शिरसाट यांना देण्यात आले.

अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच – किरण शिर्के ( परी 11 ), बेस्ट बॉलर – रितेश गायकवाड ( परी 11 ), बेस्ट बॅट्समन – संदीप गाडे ( परी 11 ), मॅन ऑफ द सिरीज – भरत परदेशी ( एल. एस. व्हिजन ).

या स्पर्धेत अनेक उत्तम खेळाडू निदर्शनास आले व आशा आहे की पुढे ते राज्य पातळीवर व देश पातळीवर खेळतील. यासाठी सहभागी होणाऱ्या सर्व हरेगाव मधील तरूण युवकांचे दिपक साठे यांनी आभार व्यक्त केले. तसेच दिपक साठे हे अनेक सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवित आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन पास्टर विल्सन बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

नॅशनल क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी नाजीमभाई शेख, उमेश गायकवाड, जुगेश त्रिभुवन, सोमा आगे, भारत सातुरे, सौरभ कुलकर्णी, गौतम खरे, रामा थोरवे, पास्टर समीर आल्हाट, सनी आल्हाट, संकेत भालेराव, आतूल भालेराव, रोहित भालेराव, सागर फासाटे, अनंत वाहूळ, गिरीश परदेशी, विश्वास खरात, बंडाभाई मनीयार, दिलीप त्रिभुवन, रमेश भालेराव, चेतन त्रिभुवन, सुनील शिनगारे, योगेश बोरगे व सुनील वाघमारे तसेच नॅशनल क्रिकेट क्लब व एल एस व्हीजन चे सर्व तरूण युवकांचे विशेष सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button