मुलाच्या निधनामुळे ४५ वर्ष काम करणाऱ्या आई- वडिलांना काढले वन विभागाच्या खोलीतुन बाहेर ! म्हैसगाव येथील प्रकार
रोपवाटिकेत आजही मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या मोठ्या झाडांची चोरी; वनविभागाचे दुर्लक्ष
राहुरी शहर | अशोक मंडलिक : तालुक्यातील म्हैसगाव येथील रोपवाटिकेत झाडे निर्माण केली जातात. या ठिकाणी काही मोठी पण झाडे आहेत. म्हैसगाव, कोळेवाडी, चिखलठाण, दरडगावथडी व नदीच्या पलीकडील या सर्व गावांना वृक्ष लागवड करण्यासाठी हे वृक्ष पोहोचवली जातात. त्यासाठी रोपे निर्माण करण्यासाठी कोळेवाडी व म्हैसगाव येथील १० ते १५ महिला व पुरुष रोजगार म्हणून योजने अंतर्गत रोपवाटिकेच्या ठिकाणी काम करत होते. परंतु काही दिवसांपासून सर्व मजूर बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी बाहेरून महिला बोलावून रोपे निर्माण करण्याचे काम वनविभागाने केले आहे. या ठिकाणी एक कुटुंब या नर्सरीचे राखण करण्यासाठी ४५ वर्षांपासुन त्या ठिकाणी राहत आहे व काम करत होते. त्यांना भेटण्यासाठी मुलगा, पत्नी व लहान मुलगी आले होते.
मुलगा ३५ वर्षांचा होता. पंरतु तो त्या वेळेस वन विभागाच्या खोलीच्या बाहेर बसला. अचानक त्याच्या पोटात खुप दुखू लागले. आई, वडिलांनी त्याला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी बोलवली. गाडी मधुन त्याला दवाखान्यात नेण्यात आले. परंतु जात असताना मुलाचे निधन झाले. यावर आई वडील दुःखी झाले. आई वडील हे मुलाचा विधी करण्यासाठी त्या गाडी मधुन आपल्या गावी गेले. त्यांनी त्याचा विधी केला.
या कालावधीत वन विभागातून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे. ते गेल्यापासून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. झाडेही चोरी जात आहे. या ठिकाणाहून चंदनाची झाडे, पावडे, टिकाऊ, रोपाला टाकण्यासाठी आणलेल्या खताच्या १४ ते १५ गोण्याही चोरी झाल्या. त्याचबरोबर पत्रे, लोखंडी अँगल, लहान साईज ४ ते ८ नग, ५ एच.पी मोटार, १ एच.पी लहान मोटार, फवारणी पंप यंत्र, व बांबु १० अशा अनेक वस्तू चोरीला गेल्या आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची काहींची नावे वन विभागाने दिली तर काहींचे नावे दिली पण नाही. वन विभागात राखण करण्यासाठी दिवसा व्यक्ती आहे, पण रात्री कुणी नाही. छोटी व मोठे झाडे सांभाळायची कुणी ? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हैसगाव येथील रोपवाटीकेत चाललेल्या अनागोंदी व हुकुमशाही कारभारावर मांजी मंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या सर्व गोष्टींची चौकशी व शहानिशा करून दोषींवर कारवाई करावी, अशी म्हैसगाव येथील ग्रांमस्थाची मागणी जोर धरु लागली आहे.
ज्या ठिकाणी झाडे निर्माण होतात त्या ठिकाणाहून आज चक्क दिवसाढवळ्या झाड चोरून चालवले होते. झाडे निर्माण करण्याच्या ठिकाणाहून चोर दिवसा झाडे चोरून घेऊन जातात यामध्ये नेमका कोणत्या वन अधिकार्यांचा हात आहे ? हे मात्र गुलदस्त्यात दिसून येत आहे. या झाडाच्या होणाऱ्या चोरीकडे वन अधिकाऱ्यांनी कधी लक्ष दिले नाही. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे नाहीतर कारवाई तरी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहे. आज त्या कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवावे किंवा मानधन तरी द्यावे हीच एक अपेक्षा ग्रामस्थांमधून होत आहे. रोपवाटिका सांभाळण्याचा अधिकार त्यांना आहे आज त्यांना एकही रुपया न देता घरातून काढून दिले, राहण्याचा व सांभाळण्याचा मोबदला तरी त्यांना देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
आज दिवसाढवळ्या झाडांची चोरी होत आहे. १५ खतांच्या गोण्या होत्या, त्याही गायब झाल्या आहेत. रोपवाटिकेच्या ठिकाणी वनविभागाने बाहेरच्या राज्यातून महिला आणल्या. त्यामुळे स्थानिक महिला पुरुषांना कामावर घेतले नाही.
_ यमुनाबाई कांबळे