अहिल्यानगर
२५ डिसेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल शिरसगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव ता. श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रांगणात दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्व शालेय जीवनपट, आठवणी उजळून निघाव्यात यासाठी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून कलाविश्वाच्या इतिहासातील सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित अविस्मरणीय माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी या विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप हे असून माजी विद्यार्थींना मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था सचिव, सहसचिव, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, व शिरसगाव ग्रामस्थ यांनी केले असून माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्राचार्या सुमती औताडे मो. क्र. ९४०५१७२९८४, पर्यवेक्षक विजय थोरात ९६६५४४१११०, ७५८८०७७१३१ यावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.