अहिल्यानगर
आरडगावात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रा.संतोष थोरात, प्रा. सगभोर हिरामण, प्रा.भास्कर बुलाखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र जगधने हे होते. या प्रसंगी डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे, माजी संचालक किशोर वने, बहुजन वंचित तालुकाध्यक्ष अनिल जाधव, दत्तात्रय म्हसे, चंद्रकांत म्हसे, राजेंद्र जाधव, निलेश जगधने, सागर जगधने, बाबासाहेब जाधव, मच्छिंद्र जाधव, गोरख थोरात, जालिंदर जाधव, डिगंबर जगधने आदींसह भिमसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.