महाराष्ट्र
क्रांतीसेनेच्या सातारा युवक जिल्हाध्यक्षपदी गिरीष घाडगे
खटाव : अंबवडे येथील गिरीष चंद्रकांत घाडगे यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या सातारा युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी गिरीष घाडगे यांना दिले.
या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका मा.आ.डाॅ शालिनीताई पाटील , पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक प्रतापसिंह पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.गिरीष घाडगे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.