अहिल्यानगर

नम्र होणे, श्रद्धेने दृढ होणे व सतत श्रद्धेच्या प्रार्थना कराव्या : लूरडस डानियल महागुरुस्वामी

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : हरिगाव मतमाउली भक्तीस्थानात आज ७३ वा पवित्र मरिया जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी डॉ लूरडस डानियल यांनी आपल्या प्रमुख प्रवचनात प्रतिपादन केले की, आज आपण पवित्र मरीयेचा वाढदिवस देशभर साजरा करीत आहोत.


परमेश्वराने जे वचन दिले होते की, मी तुम्हाला एक तारणारा पाठवीत आहे. ते पूर्ण झाले आहे. म्हणूनच आपण देवाचे आभार मानू या. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविण्यासाठी मरिया तिला पहिल्यापासून जन्मापासून निष्कलंक व पवित्र ठेवले. कारण ती प्रभू येशू ख्रिस्ताची आई होणार आहे. म्हणजे देवाची आई होणार आहे. आजच्या शुभवर्तमानात ऐकले आहे आमच्याजवळ देव आहे. नेहमी व आजच्या बिकट परिस्थितीत सुद्धा देव आहे. ज्या देवाने मनुष्याला प्रेमाने निर्माण केले आहे. तो देव आपल्याच लोकांना मरताना पाहू शकत नाही. ज्या मागे हेतू काय आहे, योजना काय आहे, हे आपल्याला माहित नाही. आपण ख्रिस्ती आहोत म्हणून देवाच्या कृपेने जे काय आपल्या जीवनात घडत आहे, आपण फक्त त्याकडे पाहत नाही. त्यापलीकडे पाहतो देव क्रूर होऊ शकत नाही. देव फक्त प्रेम आहे. जे काय पाहतो ते असहाय आहे. 

मनुष्याला दु:ख सहन होत नाही, एकाच घरातले अनेक जन मृत्यू पावले आहे. आज वाढदिवस साजरा करीत आहोत. त्या माउलीने देवाची वचने ऐकलीत ती कुमारी असताना सुद्धा ती देवपुत्राची आई होणार आहे. तिला कळत नव्हते ही परमेश्वरची कशी योजना आहे. तरी तिच्या विश्वासामुळे मी प्रभूची दासी आहे माझ्या जीवनात परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे घडू दे. तिने हो म्हटले म्हणून आपल्याला तारणारा मिळाला आहे. प्रभू येशू जेंव्हा आपल्या जीवनात येतो तेंव्हा आपले जीवन पवित्र होते. ती म्हणते मी देवावर अवलंबून आहे माझ्यात ती क्षमता नाही. आपण जेंव्हा पूर्णत: देवावर अवलंबून असतो ते देवाला काहीच अशक्य असे नाही सर्व काही शक्य होते. म्हणूनच ही मत कुमारी असताना सुद्धा तिचे लग्नसुद्धा झाले नसताना तरी तिने देवपुत्राला जन्म दिला, हे परमेश्वराचे कार्य आहे. परमेश्वराने या कार्यासाठी तिला निवडले आहे. या जन्मदिनी आपण सुद्धा स्वत: जीवनात विचार करू या, मारीयेने ज्या परमेश्वराचे वचन स्वीकारले श्रद्धेने, त्याचप्रमाणे या वचनाला तिने येशू ख्रिस्ताच्या रूपाने मानवजातीला तारणासाठी निर्माण केले. ती नारीमध्ये श्रेष्ठ आहे, परिपूर्ण आहे. या पुत्राला मानवजातीच्या उद्धारासाठी अर्पण केले आहे. तर आपल्या श्रद्धानी, विचारांनी आपल्या कृतीने, जीवनाने येशूला संपूर्ण मान दिला पाहिजे. तिने लोकांना काही संदेश दिला नाही‌. पण येशुबरोबर ती सतत होती आणि प्रभू येशूने सुद्धा आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या रक्ताने आपल्या जीवनाने मनुष्याला सशक्त केले आहे. या मातेकडे येताना स्वत: साठी प्रार्थना करू नका, कारण देवाला सर्व माहित आहे. प्रार्थना म्हणजे काय तर फक्त शब्दाने नव्हे तर कृतीने सुद्धा काहीतरी केले पाहिजे जो भुकेला आहे त्याला पाणी तरी दिले पाहिजे, प्रार्थनेचे रुपांतर कार्यात झाले पाहिजे. जे दिन दुबळे आहेत त्यांना आपल्याकडे असलेले थोडे दिले पाहिजे. त्यांचेकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून आपली माता आपल्याला प्रेरणा देत आहे आपले जीवन जरी साधे नसले तरी परमेश्वर आपल्या जीवनात काहीतरी करणार आहे त्यासाठी आपण नम्र होऊ या, श्रद्धेने दृढ होऊ या, श्रद्धेच्या सतत प्रार्थना करू या हे देवा मला सुंदर जीवन दिले आहे आणि या जीवनात मी तुझ्यासाठी काय करू. या प्रमुख कार्यक्रम प्रसंगी व्हीकर जनरल वसंत सोज्वळ, प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, संतोष साळवे, जीवन येवले, व्हिक्टर बोर्डे, डॉमनिक, रिचर्ड, सचिन मुन्तोडे आदी सहभागी होते. यात्रोत्सावास ७३ वर्षे पूर्ण झाले. त्याबद्दल फा सुरेश साठे यांनी धन्यवाद दिले.

यात्रा महोत्सवास श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक व सहकारी यांनी भेट दिली व मतमाउलीचे दर्शन घेतले.

Related Articles

Back to top button