अहिल्यानगर
ताहाराबाद येथे रिपब्लिकन सेना शाखा फलकाचे उदघाटन
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली राहूरी तालुक्यातील ताहराबाद येथे शाखा फलकाचे उद्घाटन राजू आढाव यांचे हस्ते करण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी ताहराबाद येथील उपसरपंच पोपट कीनकर हे होते. याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख भरत भांबळ, अपंग सेलचे जिल्हाप्रमुख रोहीदास अडागळे, तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष नंदूभाऊ साळवे, ताहराबादचे सरपंच नारायण झावरे आदी. मान्यवरांची भाषणे झाली. या सभेला मार्गदर्शन करताना राजू आढाव म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दलितांच्या पिडीतांच्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजनांच्या तरूणांच्या न्यायहक्कांसाठी उदिष्टांसाठी हितासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती केली आहे. रिपब्लिकन सेना ही आहोरात्र झटत आहे. इथल्या प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी रिपब्लिकन सेना जनसामान्यांना न्याय देण्यासाठी यापुढे सर्वतोपरी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार उभा करणार असून त्यासाठी आपण डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतांचा अधिकार वापरून आपला उमेदवार निवडून द्यावा असे उपस्थितांना आवाहन करून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढील काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपप्रमुख गंगानाना विधाटे यांनी केले. यावेळी शाखेचे शाखाप्रमुख म्हणून गुलाब विधाटे तर उपप्रमुख सुभाष विधाटे, महेश विधाटे व इतर असंख्य बहुजन तरूण संघटने मध्ये सहभागी झाले आहेत. शेवटी सभेचे अध्यक्ष पोपट किनकर यांनी भाषण केले व आभार तालुका संघटक विनायक विधाटे यांनी मानले.