राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले लिहिणार विकासाचा नवा अध्याय
राहुरी | अक्षय करपे : महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले हेच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील गेल्या मागील पाच वर्षाच्या काळामध्ये थांबलेल्या विकास कामांना गती देऊन मतदार संघाचा विकास करतील, असा विश्वास राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेला व्यक्त केला आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे जनमानसातील तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील जनतेच्या मनात घर निर्माण केलेले नेतृत्व आहे. आमदार नसतानाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघांमध्ये असंख्य जनतेचे असंख्य प्रश्न मार्गी लावत महायुती सरकारच्या माध्यमातून राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळे विकास कामे आणत जनहिताचे प्रश्न मार्गी लावले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांची नाळ सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी जोडलेली असल्यामुळे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये कुटुंबातील प्रत्येक माणूस त्यांना आपल्या घरातील सदस्यच मानतो व हक्काने आपली समस्या सांगतो व या सर्व समस्या शिवाजीराव कर्डिले मार्गी लावतात असा विश्वास मतदारसंघातील नागरिकांना व जनतेला असल्याने शिवाजीराव कर्डिले हेच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश असल्याने तरुणांच्या हाताला रोजगाराची नितांत गरज असताना विद्यमान लोकप्रतिनिधींना तरुणांच्या भविष्यासाठी रोजगाराच्या सुविधा निर्माण करता न आल्याने येत्या काळामध्ये शिवाजीराव कर्डिले मोठ्या प्रमाणात तरुणांच्या विकासासाठी, भविष्यासाठी, रोजगारासाठी एमआयडीसी तसेच शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा मतदारसंघामध्ये निर्मित करणार असल्याचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले आहे.