हिरडगाव सेवा सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत
श्रीगोंदा | सुभाष दरेकर : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या हिरडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेची सुरुवात सोसायटीचे चेअरमन कै. झुंबरराव दरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.
सभेचे प्रास्ताविक संचालक अशोक भुजबळ यांनी केले तर सचिव गुळुमकर यांनी सभेचे विषय वाचून सविस्तर माहिती दिली. सोसायटीचे थकीत खातेदारांना कर्ज भरण्याची विनंती केली. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच अमोल दरेकर व जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कार्तिक विठ्ठल दरेकर विज्ञान मंडळाच्या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम येऊन ईस्सौ ला सहलीला निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थानी व्हाइस चेअरमन कैलास दरेकर हे होते, आभार संतोष दरेकर यांनी मानले. यावेळी संपतराव दरेकर यांनी नवीन गाळे बांधकाम करून तरूणांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन सोसायटीला कर उपलब्ध होईल व तरुणांना पण रोजगार उपलब्ध होईल असा प्रस्ताव मांडला.
यावेळी संपतराव दरेकर, मा मॅनेजर बाळासाहेब दरेकर, देविचंद भुजबळ, मा चेअरमन शहाजी भुजबळ, ज्ञानदेव दरेकर, पोपटराव ढवळे, सर्व संचालक, सरपंच, उपसरपंच व सभासद उपस्थित होते.