छत्रपती संभाजीनगर
गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील शिवराजे मित्रमंडळ दगडी चाळ या मंडाळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त भव्य तालुका स्तरीय निबंध, चित्रकला, डान्स अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये शुक्रवारी (दि.२) रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत खुल्या गटातुन डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर शनिवारी (दि.३) रोजी ८ ते १२ वयोगटासाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी (दि.४) रोजी १२ ते २३ वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून डान्स स्पर्धेसाठी प्रथम सात हजार, द्वितीय पाच हजार तर तृतीय तीन हजार तर निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम अकराशे, द्वितीय सातशे, तृतीय पाचशे या प्रमाणे बक्षीसे दिली जाणार आहेत. इच्छुकांनी आपली नावनोंदणी करुन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवराजे मित्रमंडळ दगडी चाळीच्या वतीने करण्यात आले आहे.