अहमदनगर

सामाजिक वनीकरण प्रक्षेत्र राहुरी व राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन साजरा

राहुरी | जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, सामाजिक वनीकरण प्रक्षेत्र – राहुरी आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.

या निमित्ताने अहमदनगर येथील सुप्रसिध्द डॉ.सुभाष जाधव यांचे ‘औषधी वनस्पती आपल्या भोवती’ या विषयावर व्याख्यान झाले. सर्दी, कफ, डोकं दुखणं, त्वचा रोग या वर घरगुती उपाय केल्यास रासायनिक औषधांचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होणार नाही. तुळश, अडुळसा, पानफुटी, अक्कलकरा, सतापा यांसारख्या वनस्पती आपल्या घराभोवती किंवा परसबागेत लावल्यास उपयुक्त होईल असे विचार त्यांनी मांडले.

लागवड अधिकारी श्रीमती शुभांगी धोटे यांनी जंगल ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. त्यांची वाढ करणे म्हणजे आपली फुफ्फुसे मजबुत करण्यासारखे असल्याचे सांगून आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक तरी झाड लावले पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना मुख्याध्यापक अरूण तुपविहिरे यांनी हरित सेनेच्या कार्याचे कौतुक केले. निसर्ग हा आपला सोबती आहे त्याच्या हातात हात घालून मानवाला आपल्या विकास करायचा आहे. वनांचा होणार नाश थांबला पाहिजे नाहीतर आपण आपल्या हातांनी आपला विनाश ओढवून घेत आहोत, असं परखड मत व्यक्त केले.

विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी एनसीसी अधिकारी संतोष जाधव, वनपाल रविंद्र भोपे, अतुल बोराडे, वनरक्षक सचिन थोरात, श्रीमती सुवर्णा रायकर तसेच राहुरी प्रक्षेत्र येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार कु.सई भोरे हिने मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button