अहिल्यानगर

सरकारच्या निषेधार्थ राहुरी तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ व धरणे आंदोलन

आ. प्राजक्त तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना कार्यारंभ आदेश अद्यापही प्राप्त न झाल्याने राज्यातील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवार दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील महिन्यात ८ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी मांजरी रस्त्यावर राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांना तसेच तलाठी कार्यालयांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल सरकारच्या विरोधात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राहुरी मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान ग्रामसडक विभागाचे उपभियंता एस. जी. गायकवाड यांनी सदर कामे १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु करू, असे सांगितले होते.

त्यास एक महिना होऊनही सदर कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त न झाल्याने राज्यातील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास तालूक्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button