अहिल्यानगर
डॉ. शिवाजी काळे यांचे नोव्हेंबरमध्ये नगर आकाशवाणीवरून ‘चिंतन ‘ प्रसारित होणार
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : येथील साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव एकनाथ काळे यांचे अहमदनगर केंद्रावरून विविध विषयावर चिंतन प्रसारित होणार आहे, अशी माहिती नगर आकाशवाणी केंद्र प्रमुख बाबासाहेब खराडे यांनी दिली.
नोव्हेंबर 2021 या महिन्यात 01, 03, 12, 21, 24, 25, 26, 27, 29, 30 आणि 01 डिसेंबर 2021 या विशेष दिनानिमित्त हे चिंतन प्रसारित होणार आहे. डॉ. शिवाजी काळे हे सध्या राहाता येथील शारदा ज्यूनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ” गावकुसातल्या गोष्टी ” हा कथासंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या चिंतन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. रामकृष्ण जगताप, कवी पोपटराव पटारे, स्वामीराज कुलथे, सुयश काळे, सूरज जगताप आदिंनी केले आहे.