क्रांतीसेनेच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी शब्बीर शेख यांची निवड
कर्जत : तालुक्यातील दुरगाव येथील शब्बीर बाबासाहेब शेख यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या अहिल्यानगर युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेख यांना नियुक्तीपत्र क्रांतीसेनेचे संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिले आहे.
शब्बीर शेख यांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या निवडीमुळे क्रांतीसेनेच्या कार्याला आणखी बळ मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल क्रांतीसेनेच्या संस्थापिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, अविनाश कुरुमकर, गोकुळ नेटके, साजन शेख, दादा दंडे, भाऊसाहेब सुद्रिक, सरपंच अशोक जायभाय, पप्पू शेख, आजिनाथ जायभाय, दत्ता बिनवडे, संतोष जायभाय, सागर डाळिंबे, भाऊसाहेब भगत, आप्पासाहेब निंबाळकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.