छत्रपती संभाजीनगर
बोरगाव अर्ज येथे शेतकर्यांना मार्गदर्शन
विजय चिडे/ पाचोड : फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूत समाधान अण्णा काळे, नवनाथ जनार्धन गाडेकर, रोहित विजय देखणे, यश प्रसाद यांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकर्यांना आधुनिक यंत्रणांची माहीती देत आहे.
कृषीदूतांनी बीज प्रक्रिया, रासायनिक खत व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, माती परीक्षण, निंबोळी अर्क तयार करणे, शेतीमध्ये उपयोगी असे विविध ॲप अणि त्या द्वारे पिकांची नोंदणी, नियोजन व व्यवस्थापन करणे, तसेच पिकावरील रोग निदान कसा करावा आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे त्याच बरोबर दररोज चे बाजार भाव आणि बाजारपेठ, जनावरांचे विविध आजार, लसीकरण मोहीम राबविणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे इत्यादी माहिती शेतकर्यांना समजावून सांगितली. या वेळी सरपंच, शिवाजी खरात व शेतकरी रतन बलांडे, बंडू बलांडे, किशन मस्के यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कृषीदूतांना धनेश्वरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष वैद्य, प्रोफेसर कल्पेश शेलार, प्रोफेसर विजय मुंगीलवार यांनी मार्गदर्शन केले.