दावरवाडी मध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
मयत आप्पासाहेब सातपुते |
या विषयी अधिक माहीती अशी की, दावरवाडी शिवारात गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी आप्पासाहेब भानुदास सातपुते यांच्या शेतातील पिक या अतिवृष्टीमुळे वाया गेले. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे त्यांच बरोबर कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करावा या विवंचनेतून गावातील खळवाडी भागातील स्वतःच्या शेतात गट नबंर ४३५ मधील चिंचाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी घरातील सदस्यांनी बघितले असता आप्पासाहेब सातपुते हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने आरडाओरडा करत गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली घेऊन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित करून उत्तणीय तपासणी केली. या घटनेची माहिती मिळताच सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहीते, पवन चव्हाण व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,आप्पासाहेब हा कुटुंबातील सर्वात मोठा होता.