छत्रपती संभाजीनगर
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार..
विजय चिडे/पाचोड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी पिंपळगाव नजीक अज्ञात धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री (दि.१०) दहाच्या वाजेच्या सुमारास घडली आहे. शकील रज्जाक शेख वय (२३ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील शकील शेख हा गेल्या अनेक दिवसापासून समृद्धी महामार्गावर काम करत आहे. तो दररोज सकाळी आपल्या दुचाकीवरून गावाकडून औरंगाबाद ला कामासाठी जात असे अन् सांयकाळी आपली दिवसभराची कामे अटोपून गावाकडं दुचाकी क्रमांक (एम. एच.20.ई.झेड 9947) वरून घरी येत असताना रात्री दहाच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी- पिंपळगाव शिवारामध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी जवळपास नव्वद ते शंभर फूट फरफटत गेली. यामध्ये शकील च्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला आहे.
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ याची माहीती भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला दिली. रुग्णवाहिका चालक व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शकीलला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथिल कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.घुगे यांनी त्यास तपासून मृत घोषित आहे.या घटनेची नोंद करमाड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहे.