अहमदनगर

शेती महामंडळ कामगार प्रश्नी तडजोडीचा प्रस्ताव ना.विखेना सुपूर्त

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल सभागृह येथे राज्यातील शेती महामंडळाच्या सर्व मळ्याच्या ९ कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यात शेती महामंडळ संचालक यांच्या बैठकीत शेती महामंडळ कामगारांना दोन गुंठे जागा देण्याचे महसूल मंत्री यांनी आश्वासन दिले.

त्याबद्दल संघटनांच्या वतीने ना.विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला व इतर मागण्यांबाबत बैठकीत ठरल्याप्रमाणे आज दि.२१ सप्टेंबर रोजी थकीत देणी, बोनस, वेतन आयोग आदी उर्वरित मागण्याबाबत तडजोडीचा प्रस्ताव महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना लोणी येथील धनंजय गाडगीळ सभागृह येथे ९ कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वतीने सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला व तडजोडीचा मसुदा वाचून दाखविण्यात आला. या प्रस्तावामध्ये सर्व कामगारांना २ गुंठे जागा देऊन घरे बांधून देण्यात यावे व इतर मागण्या करण्यात आल्या.

त्यावेळी सुभाष कुलकर्णी, ज्ञानदेव आहेर, वेणुनाथ बोळींज, सुधाकर चव्हाण, बाळासाहेब आग्रे, भीमा आहेर, नामदेव गायकवाड, दिलीप निकम, अशोक शेळके, भालचंद्र कोल्हटकर, कारभारी त्रिभुवन, संदीप लाळे, प्रकाश ठाकरे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button