राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कु. मानसी डोळस हीने रौप्यपदक पटकावले
राहुरी | अशोक मंडलिक : बीड शहरात नुकत्याच पार पडलेल्या ३४ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १४ वजन गटामध्ये राहुरी शहरातील सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयातील इयत्ता १० वीत शिकत असणाऱ्या कु. मानसी मिनिनाथ डोळस हिने आपले वर्चस्व राखत रौप्यपदक पटकावले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड संघटनेने येथील जिल्हा क्रिडा संकुलात महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, प्रविण बोरसे, कोषाध्यक्ष व्यंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पडल्या. अंतिम निकाला अंती राहुरी शहराची कन्या मानसी मिनिनाथ डोळस हिने अत्यंत कौशल्यपूर्वक खेळ खेळून रौप्यपदक पटकावले.