सामाजिक

राजनदादा शिंदे पाटील हे रुबाबदार अन् तेवढंच जबाबदार व्यक्तीमत्व

संगमनेर शहर : संगमनेर खुर्द गटात गेली कित्येक दिवसांपासून राजनदादा शिंदे हे सर्व मायबाप जनतेसाठी देवदूत बनून काम करत आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुठलंही पद नसताना या काळ्या मातीशी आपली असलेली नाळ त्यांनी कायम घट्ट ठेवली. केवळ माणुसकी या पदालाच त्यांनी आपलं सर्वस्व मानून सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटप, आरोग्य शिबीरे, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप, तसेच प्रत्येक गाव व वाडीवस्तीवर स्वखर्चातून दिवसरात्र पाण्याचे टँकर नियमित सुरु केलेले आहेत. गावातील लग्न समारंभ, वाढदिवस तसेच इतर सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांस ते नेहमीच उपस्थित असतात. प्रत्येकाच्या सुखदुःखातही ते सहभागी होतात.

एकाच गावात सकाळी एक व संध्याकाळी एक असे दोन कार्यक्रम असले तरी दादा दोन्ही कार्यक्रमास उपस्थित असतात, हा माझा अनुभव आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात राजनदादा शिंदे युवा मंचच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यातूनच संगमनेर खुर्द गट परिवारात त्यांनी युवकांची मोठी फळी उभारली. समाजसेवेचं हाती घेतलेलं हे शिवधनुष्य दादांनी लिलया पेललं ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात अमूल्य वेळ या मायबाप जनतेच्या सेवेसाठी दान करणारा हा माणूस आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी ऊर्जाश्रोत आहे.

आपलं कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व सिद्ध करत या माणसाने सामाज्यात आपली एक वेगळी निस्वार्थी प्रतिमा निर्माण केली आहे. कुणावरही टीका न करता व कधीही मोठेपणाचा आव न आणता त्यांनी आपल्या प्रामाणिक कामातून जनसामान्यांच्या हृदयात आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे भविष्यात राजनपर्वाची ही दैदीप्यमान वाटचाल उत्तरोत्तर आणखी बहरत राहील यात तिळमात्र शंका नाही. लहानांपासून ते जेष्ठ व्यक्तींच्या मनावर राज्य करणारं, सदैव संपर्कात असणारं, सहजपणे उपलब्ध असणारं, सर्वांशी आपुलकीने वागणारं, आपल्या चेहऱ्यावर कायम स्मित हास्य राखणारं, स्वकर्तृत्वाचं दुसरं नाव असणारं, रुबाबदार व तेवढंच जबाबदार असणारं व्यक्तीमत्व म्हणजेच राजनदादा शिंदे पाटील.

मी राज्यशास्त्र विषयातून पदवीधर असल्यामुळे माझी या क्षेत्राशी चांगली ओळख आहे. मी कुणाचा समर्थकही नाही व मोठेपणासाठी मुद्दाम कुणाची स्तुतीही करत नाही. राजकारण व समाजकारणात मी आजपर्यंत खुप माणसं पाहिली. मात्र, या माणसासारखं सामाजिक क्षेत्रात जीव ओतून असंख्य माणसं कमावणारा माणूस मी आज पहिल्यांदा बघतोय. त्यांच्या या कामाचा धडाका पाहून माझ्याही लेखणीला धार चढत गेली व लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून मलाही त्यांच्या कामाचा समर्थक व्हायला नक्कीच आवडेल.

_ बाळासाहेब भोर, अखिल भारतीय क्रांतिसेना, संगमनेर

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button