छत्रपती संभाजीनगर

बिडकीन येथील स.भु.प्रशालेत गोविंदभाई श्राॅफ यांची पुण्यतिथी साजरी

विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत रविवार,२१ रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी, मराठवाडा विकासाचे शिल्पकार पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्राॅफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्ञअभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार वैद्य, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्या जीवन कार्यावर आधारित तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेची विद्यार्थीनी कु.पायल धुमाळ हिने आपल्या ओघवत्या भाषाशैलीत अतिशय अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी आदरणीय भाईंच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यावर प्रकाश टाकत भाईंना अपेक्षित असलेले कार्य आपल्या कडून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी प्रशालेच्या गीतमंचाने सर्वधर्मीय प्रार्थना सुंदर आवाजात सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ राऊत व आभार लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी ज्ञानेश्वर चाटुपळे सह प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button