अहमदनगर
क्रांतीसेनेच्या मागणीनंतर मांजराची नसबंदीची शस्त्रक्रिया
राहुरी : येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत राहुरी येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पहिल्यांदाच मांजराची नसबंदीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
निवेदनात म्हटले होते की, मांजर या प्राण्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने अनेक ठिकाणी मांजराचे पालन करणारे हे नुकतेच जन्मलेल्या पिल्लांना रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे या पिल्लांचे हाल होऊन ते मरण पावतात. राहुरीत नसबंदीसारख्या शस्त्रक्रिया होत नसल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर या प्राण्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियाची व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे आदींनी केली होती.
या मागणीची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ सुनील तुंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शितलकुमार नवले व डॉ. विठ्ठल निमसे यांनी नुकतीच मांजर या प्राण्याची नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ सुनील तुंबारे यांनी क्रांतीसेनेकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.