अहिल्यानगर
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माधव हासे यांचा सत्कार
संगमनेर शहर : संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माधव हासे यांचा सत्कार युवक काँग्रेस प्रेदश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली माधव हासे पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राजापूर गावातील नागरिकांच्या वतीने व मा.आर.एम. कातोरे साहेब मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हा परिषद तथा नियोजन समिती अहमदनगर सदस्य आर.एम. कातोरे, व्हा. चेअरमन स. म. भा. थो. स. सा. का. संतोष हासे पाटील, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, राजापूर येथील ग्रामस्थ, आर.एम. कातोरे मित्र मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.



