केंद्रीय राखीव पोलीस दलातून प्रदीर्घ देश सेवा करून ज्ञानदेव जगधने उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त

जावेद शेख : ज्ञानदेव कोंडीबा जगधने यांनी 37 वर्ष केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये देश सेवा केली त्याबद्दल त्यांचा श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटी, जागृती प्रतिष्ठान व वाचनालय त्याचप्रमाणे जगधने, शेलार परिवारातील सदस्य आणि नातेवाईक यांचे वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या हस्ते ज्ञानदेव जगधने यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी करण ससाणे यांनी जगधने यांच्या देश सेवेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की ज्या वयामध्ये मित्रांबरोबर कॉलेजमध्ये रमायचे असते त्यावेळेस देश सेवेसाठी ज्ञानदेव जगधने यांनी सुखाचा त्याग करून देश सेवेची व्रत घेतले. जम्मू-काश्मीर धगधगत असताना अनेक वर्ष तेथे सेवा केली. आसाम पूर्व भारत व सेवानिवृत्त वेळी पुणे येथे ते कार्यरत होते. त्यांचा देश सेवेचा आदर्श पुढील पिढीतील तरुणांना निश्चित होईल. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना केंद्रीय राखीव दलातर्फे ही सेवानिवृत्ती निमित्त सत्कार तसेच सेवेत असताना अनेक सेवा पदक मिळालेले आहेत.
याप्रसंगी जागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त प्रा. बाबासाहेब शेलार यांनी ज्ञानदेव जगधने यांच्या संघर्ष कथन केला. सेवेत केलेले परिश्रम व सेवेत असताना गावाकडे परिवाराकडे आणि नातेवाईकांकडे दिलेले लक्ष, सर्वांना केलेली मदत यामुळे ते सर्व नातेवाईकात लोकप्रिय आहेत. त्यांचा स्वभाव सत्यप्रिय व शांत मृदभाषिक असून सेवानिवृत्तीनंतर पुढील काळात त्यांनी त्यांचा वेळ कुटुंब व नातेवाईक यांच्यासाठी द्यावा या करिता त्यांना निरोगी आयुष्य लाभावे अशा सदिच्छा दिल्या.
याप्रसंगी ज्ञानदेव जगधने यांच्या पत्नी संगीताताई जगधने यांचाही उल्लेख आवर्जून केला. पती देश सेवेत परराज्यात असताना खंबीरपणे त्यांनी कुटुंब सांभाळलं. मुलं चांगली शिकवली. संस्कार बनवली. तसेच ज्ञानदेव जगधने यांचे बंधू चांगदेव जगधने वहिनी कांता जगधने यांनी त्यांना संघर्ष काळात भक्कम साथ दिली. सामाजिक कार्यकर्ते व जगधने यांचे भाचे यांनी रवींद्र शेलार यांनी ज्ञानदेव जगधने यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मामांनी कशाप्रकारे संघर्ष केला आणि सर्वांना साथ दिली याविषयी त्यांनी माहिती दिली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब शेलार, मंडलिक भाऊसाहेब, टाकण्याचे पोलीस पाटील जगधने, स्वप्निल साळवे, अण्णासाहेब शेलार, चंद्रकांत जगधने, वसंतराव वाकळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. जगधने यांच्या सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आमदार लहुजी कानडे, अमृतराव धुमाळ आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.