सामाजिक

जयहिंद लोकचळवळ आयोजित वृक्षारोपणास पेमगिरीतील चंदनगडावर प्रारंभ

स्वराज्यसंकल्पभूमीत वृक्षारोपण करताना डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे व पेमगिरी ग्रामस्थ.
संगमनेर / बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील चंदनगडावर आज जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला.मागील वर्षीही चंदनगड तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून याच ठिकाणी वृक्षारोपण केलं होतं ती झाडं आज सुस्थितीत असून झाडांची चांगली वाढ झाली आहे.टेकडीवर खंडोबाचे सुंदर मंदिर बांधलेले असून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे परिणामी या चंदनगड टेकडीला नवसंजीवनी मिळाली आहे. आजच्या वृक्षारोपणात प्रामुख्याने चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली जेणेकरून भविष्यात या झाडांपासून गावाला आर्थिक उत्पन्न मिळू शकते.पेमगिरी गावाला तिनही बाजुंनी डोंगर असून सर्वच डोंगरांवर मोठया प्रमाणात वृक्षलागवड व जलसंधारणाची कामे झाली आहेत. आजच्या वृक्षारोपणप्रसंगी नाशिक विधानपरिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबेे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, शॅप्रोचे संचालक शांताराम डुबे, पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे, सरपंच सौ.द्वारका डुबे, उप सरपंच खंडू जेडगूले, ग्रामसेवक भांड, कामगार पोलीस पाटील मिलिंद टपाल, जय हिंद लोकचळवळीचे सर्व पदाधिकारी,पाणी फौंडेशनचे सर्व सदस्य, चंदनगड तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य व पेमगिरीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button