राजकीय
केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लताबाई राजेंद्र मगर यांची बिनविरोध निवड
राहुरी शहर/अशोक मंडलिक : तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लताबाई राजेंद्र मगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी केंदळ खुर्द (ता.राहुरी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडनुक निर्णयक अधिकारी बी.डी. मेहञे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत सरपंच लताबाई मगर यांची एकमुखी निवड जाहीर करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब आढाव, सदस्य सतिष आढाव, गोरक जाधव, राजेंद्र आढाव, ऋषाली आढाव, मंदाकीनी आढाव, संगिता केदारी आदिंसह लक्ष्मण आढाव, मच्छिंद्र आढाव, संदिप आढाव, अनिल आढाव, संजय आढाव, बाबासाहेब आढाव, मच्छिंद्र झिने, नामदेव आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीराम आढाव, रामराव आढाव, रामदास मगर, गोरक्षनाथ आढाव, शिवाजी आढाव, गोविंद आढाव, गणेश आढाव आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसंगी तलाठी राहुल क-हाड, ग्रामसेवक एस.आर. पालवे, पोलीस पाटील प्रल्हाद तारडे यांनी सहाय्यक केले तर राहुरी पोलीस ठाण्याचे पो.ह.राजेंद्र गायकवाड, पो.काॅ. देवीदास कोकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.