अहिल्यानगर
शिरसगाव येथे बैलपोळा सण उत्साहात
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे शिरसगाव वेशीतून सर्व शेतकऱ्यांनी आपापली बैल जोड्या फटाके वाजवून नियोजित वेळी आणून हनुमान मंदिर भागातून दर्शन घेवून पोळा फुटल्याचा आनंद झाला.
आता पहिल्यासारखे बैल जोड्या राहिल्या नाहीत. थोड्या शेतकऱ्यांकडे पारंपारिक बैलजोड्या आहेत. आजच्या बैलपोळा सणास श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री चेअरमन गणेशराव मुदगुले शिरसगाव यांनी आलेल्या बैलजोड्या व शेतकरी यांना सन्मानपूर्वक सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सुरेश मुदगुले व गावातील शेतकरी उपस्थित होते.