पवित्र मरीयेचे प्रार्थनामय जीवन, निस्वार्थ व त्यागी जीवन, समाधान याचे आचरण गरजेचे-फा. अक्षय आढाव
हरेगाव मतमाउली यात्रापूर्व तिसरा शनिवार नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पोप फ्रान्सिस म्हणतात नद्या स्वत: चे पाणी पीत नाहीत. झाडे त्यांची फळे खात नाहीत. सूर्य स्वत: चमकत नाही व फुले स्वत: साठी सुगंध पसरवत नाही. इतरासाठी जगणे हा निसर्गाचा नियम आहे. आपण एकमेकांना मदत करण्यासाठी जन्माला आलो आहोत. जेंव्हा तुम्ही आनंदी असतात, खूप चागले असते, परंतु जेव्हा तुमच्यामुळे कोणी आनंदी होतो, तेव्हा आयुष्य उत्कृष्ट होते. हे शब्द आपल्या जीवनात तंतोतंत जुळतात.
पवित्र मरिया पवित्र कुटुंबाची आई होती. आपल्या जीवनाचे प्रेरणास्थान आहे. तिच्या जीवनात पाहिले तर तिचे जीवनामध्ये निस्वार्थी प्रेम, त्यागी वृत्ती दिसते. त्या वृत्तीव्दारे आपल्याला जाणीव होते कशा प्रकारे आपण उत्कृष्ट आनंदी व सुख शांतीमय कुटुंब स्थापन करू शकतो. आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे कुटुंबात सुखशांती स्थापन करून घ्यावी, ते आपल्याला शिकवत असते. आपण तीन गोष्टींवर मनन चिंतन करीत असतो. तिचे प्रार्थनामय व जीवन, जगले होते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे निस्वार्थी व त्यागी प्रेम, तिसरी गोष्ट आहे समाधान, प्रार्थना व संवाद प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब हे लहान ख्रीस्तसभा आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये रहाणे हे अगत्याचे आहे.
वरील तिन्हीं गोष्टी जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला पवित्र मरीयेची आठवण होते. तिने या तिन्ही गोष्टींचा अवलंब करून एक सुखी, समाधानी व पवित्र कुटुंब प्रस्थापित केले. म्हणून आपल्याला या तिन्ही गोष्टी प्रार्थना, निस्वार्थी प्रेम, व समाधान या गोष्टींचा अवलंब आपल्या कुटुंबात करणे गरजेचे आहे. त्यामुळे आनंदी व सुखमय वातावरण प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन रे फा. अक्षय आढाव यांनी आज तिसऱ्या मतमाउली यात्रापूर्व शनिवारी “पवित्र मरिया व कुटुंब” या विषयावर नोव्हेना प्रसंगी केले.
यावेळी ज्ञानमाउली चर्च नेवासा, नित्य सहाय्य माता चर्च अशोकनगर येथील धर्मगुरू दिलीप जाधव, फा मुक्तीप्रसाद, विक्रम शिणगारे, फा.संतान रॉड्रीग्ज, फ्रान्सिस ओहोळ, प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ आदी सहभागी झाले होते. यावेळी आ. लहू कानडे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी उपस्थित राहून मतमाउली यात्रेसाठी आवश्यक सहकार्य सुविधा देण्याचे आश्वासन दिले. येत्या चौथ्या शनिवारी दि. २७ जुलै रोजी “आरोग्यदायिनी प.मारिया विषयावर लोयोला सदन चर्च, संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर येथील धर्मगुरू प्रवचन करतील. तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरेगाव प्रमुख धर्मगुरू रे.फा.डॉमनिक रोझारिओ, व सहा.धर्मगुरू यांनी केले आहे.