धार्मिक

शिरसगाव येथे श्री महादेव यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील श्री महादेव मंदिर व विठ्ठल मंदिर या ठिकाणी श्री महादेव यात्रा महोत्सव डीजेच्या आवाजात भव्य मिरवणूकीने साजरा करण्यात आला. सायंकाळी गोंधवणी ते शिरसगाव महादेव मंदिर पर्यंत सनई, डीजे च्या आवाजात श्री शंकर पार्वती रथात बसून, चौकाचौकात महिला, पुरुषांनी आनंदाने सहभाग घेतला.

प्रारंभी गणेशराव मुदगुले यांनी श्री महादेव प्रतिमेचे पूजन केले. शिरसगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली महादेव यात्रा उत्सव संपन्न झाला. मंदिरावर फेटा चढविण्यात आला. मिरवणुकीत शोभेचे दारूकाम, तसेच स्नेहमाला डान्स अकॅडमी कलाकार व प्रशिक्षक विनोद वाघमारे यांनी उत्कृष्ट प्रकारे तांडवनृत्य सादर केले. यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी महादेव मंदिर यात्रा कमिटीचे अध्यक्ष नितीन गवारे, उपाध्यक्ष अनिल बढे, खजिनदार गणेश वाघ, सदस्य राजेंद्र गजानन गवारे, सुरेश मुदगुले, सचिन ज्ञानदेव गवारे, राजेश यादव, अमोल जाधव, दत्तात्रय पवार, सनी बिलवरे, शुभम ताके आदिनी सहकार्य केले आहे. महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष फकीरचंद बकाल, बापूसाहेब काळे, चेअरमन शिवाजी गवारे, सुरेश ताके, कचरू बढे, सरपंच राणीताई संदीप वाघमारे, उपसरपंच संजय यादव व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच लक्ष्मण यादव कडू, पवार मुळेगुरु, भागचंद जगताप, भास्कर ताके, सिताराम धनाड, पाराजी ताके, गीताराम जाधव, बाळासाहेब बकाल, बाळासाहेब दगडू गवारे, सुभाष गवारे, ज्ञानदेव गवारे, नंदू यादव, बाबासाहेब यादव, शरद दिवटे, मनोज बर्वे, दत्ता जाधव, निलेश यादव, संदीप वाघमारे, बाळासाहेब लांडगे, प्रसाद सातूरे, अशोकराव रासकर, केदार यादव, मुन्ना यादव, रंगनाथ ताके आदीचे सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button