कृषी

भात पिकावरील रोग प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यामध्ये लोणावळा कृषि संशोधन केंद्राचे विशेष योगदान – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील लोणावळा येथील कृषि संशोधन केंद्राने आजपर्यंत भात पिकावरील विविध रोग प्रतिकारक्षम असे 10 वाण विकसित केले आहेत. त्याचप्रमाणे भात पिकावरील विविध रोगांच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत नऊ शिफारशी दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात या केंद्राने विकसित केलेल्या रोगप्रतिकारक्षम वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याची दिसून येत असून त्यामुळे भात पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

लोणावळा येथील कृषि संशोधन केंद्राला कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्राने लोणावळा येथे केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला. याप्रसंगी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरणसिंह रघुवंशी यांनी विविध संशोधन प्रयोग तसेच विस्तार कार्यक्रम यांचे सादरीकरण केले. यावेळी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर तसेच लोणावळा कृषि संशोधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button