धार्मिक

हरेगाव येथे नाताळ सण उत्साहात साजरा

जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी धर्मगुरू, भाविकांना दिल्या शुभेच्छा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव संत तेरेजा चर्च येथे नाताळ सणानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, आ.लहू कानडे, सचिन गुजर, माजी आ.भानुदास मुरकुटे, भाजपचे नितीन दिनकर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, रवी गायकवाड, पवन पाउलबुद्धे, प्रकाश ताके, अमोल नाईक, अनिल भनगडे, सुभाष बोधक, जितेंद्र गोलवड, भीमराज बागुल, सुभाष पंडित, सुनील शिणगारे, सरपंच दिलीप त्रिभुवन आदींसह मान्यवरांनी हरेगाव येथे उपस्थित राहून संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरु डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी व सर्व भाविकांना चर्चचा पवित्र मिस्सा झाल्यावर सणाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सणानिमित्त केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. रात्री १० वा. नाताळगीते, १०.५० वा पवित्र संगीत मिस्सा झाला. दि २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. पवित्र मिस्सा, दि २६ डिसेंबर रोजी रक्तसाक्षी संत स्टीफन स्मृतिदिन, सायं. ६ वा. नाताळ गीत स्पर्धा, दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा.वृद्ध भाविकांसाठी पवित्र मिस्सा, व बाबासाहेब सोनावणे प्रितीभोजन, दि २८-निष्पाप बालक दिन व सायं. ५ वा. कॅण्डल मिरवणूक, दि २९- संत बेकेट स्मृतिदिन, दि ३१ डिसेंबर-पवित्र कुटुंबाचा सण, ७.३० वा. पवित्र मिस्सा [संत लुक विभाग], ९.३० पवित्र तास, रात्री १०.३० वा.पवित्र संगीत मिस्सा, दि. १ जानेवारी २०२४ सकाळी ८ वा. पवित्र संगीत मिस्सा, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, सर्व धर्मभगिनी व ग्रामस्थांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button