सामाजिक

आनंदाच्या क्षणातही काळे व काटे परिवाराकडून राखले सामाजिक भान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मुलीच्या विवाह सोहळ्या निमित्ताने शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 1 लाख 50 हजार रुपये व दिव्यांग तरुणासाठी रोजगार निर्मितीसाठी छोटेसे उद्योग मशीन काळे व काटे परिवाराकडून दिले गेले.

सदर देणगी व भेट वस्तू शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मा. मंत्री अनिल पाटील, माजी आ. भानुदास मुरुकुटे, बिपीनदादा कोल्हे, राजश्रीताई ससाणे, अनुराधाताई आदिक या मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

जेष्ठ विधितज्ञ ॲड.अजित काळे यांची कन्या साक्षी व डॉ.डि.एस.काटे यांचे चिरंजीव गणेश काटे यांचा विवाह सोहळा १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी ॲड.अजित काळे यांनी शेतकऱ्यांप्रति एक सामाजिक बांधिलकी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळणाऱ्या दोन संस्थांना एक लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ५१ हजार रुपये असे 1 लाख 51 हजार रुपये जमा केले आहे.

तसेच डॉ. काटे यांनी भोकरदन तालुक्यातील करजगावचे रहिवासी चौरंगीनाथ लोखंडे यांना दोन्ही हात नाही, या गोष्टीची जाणीव ठेवून काटे यांनी दिव्यांग तरुण चौरंगीनाथ लोखंडे या दिव्यांगाला रोजगार मिळावा यासाठी पत्रावळी बनवण्याचे एक मशीन भेट दिले. यातून चौरंगीनाथ याला स्वयंरोजगार निर्माण होणार असून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतो.

आपण जीवन जगत असताना स्वत:साठी सर्व काही करतो, परंतु आपण इतर गरजु लोकांना मदत केली पाहिजे या उद्देशाने या दोन्ही परिवाराने समाजा समोर एक काहीतरी वेगळे करून एक नवीन पायंडा पाडला. स्वर्गीय बबनराव काळे यांचे चिरंजीव ॲड. अजित काळे हे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष असून त्यांनी एक शेतकरी समाजाचा सामाजिक वारसा पुढे चालवण्याचे दायित्व जपले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button